मराठी भाषा गौरव दिन २६-२७ फेब्रुवारी २०२०

​२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड श्री. वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस

19_edited
20
17
04
16
08
02
28
14
marathi bhasha gaurav din
वैशाली सामंत
सुप्रसिद्ध लेखिका सौ.माधवी कुंटे
 

मराठी भाषा गौरव दिन

मायबोलीचा प्रचार आणि प्रसार

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक पद्मभूषण मा. श्री. विष्णु वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकार तर्फे जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. 

​शासनाच्या कार्यालयांमध्ये यानिमित्त मराठी भाषा वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने तसेच मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी  विविध उपक्रम राबविले जातात. 

'विलेपार्ले पोलिस ठाणे' तर्फे २०१९ मध्ये प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विलेपार्ले (पू), मुंबई या ठिकाणी मराठी साहित्यिक, कलाकार, यांचा यथोचित सत्कार समारंभ प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.  या कार्यक्रमात पद्मश्री सौ. पद्मजा फेणणी, श्री. अजित कडकडे, श्री. श्रीधर फडके, सौ. वैशाली सामंत यांनी बहारदार मराठी भक्तिगीते आणि भावगीते सादर केली होती.  या कार्यक्रमास पार्लेकर रहिवाशांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला होता. 

या वर्षी देखील 'विलेपार्ले पोलिस ठाणे' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिति' यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी आणि गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ठीक ६:३० वाजता प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विलेपार्ले (पू), मुंबई या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

आपण विलेपार्ले विभागातील प्रतिष्ठित नागरिक आहात, मी स्थानिक पोलिस ठाणे म्हणजेच विलेपार्ले पोलिस ठाणे, प्रमुख या नात्याने आपणास या कार्यक्रमाकरिता आमंत्रित करीत आहे.  तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून मराठी भाषा वृद्धिंगत करण्याच्या आमच्या या प्रयत्नास पाठबळ देऊन आमचे मनोगत उंचवावे, ही विनंती.

आपली कृपाभिलाषी

​अलका मांडवे

वरिष्ठ पोलिस निरीक्षक

विलेपार्ले पोलिस ठाणे,  मुंबई

 
 

मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम रूपरेषा

२६ फेब्रुवारी - श्री अनंत पणशीकर यांच्या नाटय़संपदा संस्थेतर्फे तीन एकांकिका

मान मराठी मनाचा अंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेत विजेते विद्यार्थी यांचा सन्मान 

२७ फेब्रुवारी - डॉक्टर विजया वाड

विविध कार्यक्रम

ABC

XYZ

 

Alka Mandve

Senior PI - VileParle Police Station

Rajendra Kane

Police inspector ( crime)
Vileparle police station

Pravin Ghadge

Police sub inspector (A.T.C.)
Vileparle police station

Shivshankar Bhosle

Assitant police inspector (Detection)

Vileparle Police Station

 

Get in Touch

Vile Parle Police Station

Avinash Dharmadhikari

+91-99306 85831

©2020 by marathi-bhasha-gaurav-din, Designed by Going Digital